Pimpri : पिंपरीमधील मध्यवस्तीत घराला आग

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील साई चौकात घराला आग लागली. ही घटना आज, सोमवारी (दि. 30) पावणेआठच्या सुमारास घडली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज रात्री पावणेआठच्या सुमारास पिंपरी येथील साई चौकात एका घराला आग लागली. घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन विभागाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. काही क्षणात जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. घरात कोणीही अडकले नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.