Pimpri : परप्रांतीय नागरिकांना आंतरराज्य प्रवास करण्यासाठी नजीकच्या पोलिस चौकीवर अर्ज उपलब्ध करून द्यावे -गजानन बाबर

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील मुंबई, पुणेसह इतर जिल्हे रेड झोनमध्ये मोडत असल्याने मुंबई व पुणे जिल्ह्यातील नागरिकांना महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात जाण्यास तसेच बाहेरील जिल्ह्यातील नागरिकांना मुंबई व पुण्यामध्ये येण्यास सरकारने मनाई केली आहे. मात्र, ही सवलत फक्त इतर राज्यांमधील मजूर व कामगारांना दिली आहे.

या मजूर व कामगारांना त्यांच्या राज्यात परत जाण्यासाठी ते अडकून पडलेल्या ठिकाणी नजीकच्या पोलिस चौकीमध्ये, अर्ज करायचा आहे असे शासनाने सूचित केले आहे. पण, मजूर अशिक्षित असल्याने त्यांना अर्ज कुठे भेटतो? याची कल्पना नसते. म्हणून प्रत्येक पोलीस चौकीत मध्ये मजुरांसाठी अर्ज उपलब्ध करून द्यावेत, अशी विनंती माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.

महापालिका आयुक्त यांच्या कडे पत्राद्वारे केलेल्या विनंतीत गजानन बाबर यांनी म्हणटले आहे. मजूर वर्ग अशिक्षित असल्याने त्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याची माहीती नाही. त्यामुळे त्यांना मराठी व हिंदी भाषेमध्ये अर्ज उपलब्ध करून द्यावेत. तसेच हे अर्ज भरून देण्याकरता एखादा अधिकारी नियुक्त करावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.

त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर हद्दीतील सर्व पोलीस चौकीमध्ये तसेच पोलिस स्टेशनमध्ये व महानगरपालिकेने पुढाकार घेऊन प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये अर्ज उपलब्ध करून द्यावेत, अशी विनंती त्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.