Pimpri: नेहरूनगरमध्ये चार टेम्पोची तोडफोड; दहशत माजविण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – चार ते पाच जणाच्या टोळक्याने रस्त्यालगत उभ्या असलेल्या चार टेम्पोच्या काचा फोडून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज (शुक्रवारी) पहाटे साडेचारच्या सुमारास नेहरूनगर येथील संतोषी माता चौकात घडली.

याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यानुसार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नेहरूनगर येथे संतोषी माता चौकात रस्त्यालगत टेम्पो पार्क केले जातात. शुक्रवारी पहाटे दुचाकीवरून आलेल्या चार ते पाच जणाच्या टोळक्याने चार टेम्पोच्या काचा फोडून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये चारही टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून दाखल फिर्यादिनुसार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस याचा तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.