Pimpri : गाडी घेण्याच्या बहाण्याने फसवणूक

एमपीसी न्यूज – गाडी घेऊन देण्याच्या बहाण्याने एका विद्यार्थ्याची फसवणूक करण्यात आली. ही घटना पिंपरी येथे घडली.

अभिषेक सुभाष पाटील (वय 21, रा. वरधस्व हॉस्टेल, वारंगवाडी, डॉ. डी.वाय.पाटील कॉलेज रोड, आंबीगाव, तळेगाव) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार महेंद्र सुरेश जैसवाल आणि त्याचे दोन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2018 या कालावधीत आरोपींनी आपसांत संगनमत करून गाडी घेऊन देण्याच्या नावाखाली फिर्यादी यांच्या बहिणीच्या नावे असलेले घरभाडे ऍग्रिमेंट, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि 28 हजार 600 रुपये घेतले. मात्र ठरल्याप्रमाणे गाडी दिली नाही. तसेच दिलेल्या पैशाचा परस्पर अपहार केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अभिषेक यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पोलीस उपनिरीक्षक हरिदास बोचरे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.