Chinchwad : अन्नदान श्रेष्ठ दान- पालकमंत्री गिरीश बापट

महाराजा अग्रसेन किचन ट्रस्टचे उद्घाटन 

एमपीसी न्यूज –  समाजात चांगल्या कार्याची माहिती  लवकर पोचत नाही मात्र वाईट कार्याची माहिती वाऱ्यासारखी पसरते.असे सांगत अन्नदान करणे हे श्रेष्ठ  कार्य  आहे. असे प्रतिसाद पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.रुग्णांना मोफत भोजन पुरविणाऱ्या महाराजा आग्रसेन किचन ट्रस्टचे चिंचवड येथे उदघाटन करण्यात आले.यावेळी ते बोलत होते. 

यावेळी अगरवाल फेडरेशनचे उपाध्यक्ष विनोद बंसल,उद्योजक प्रेमचंद मित्तल,अग्रसेन ट्रस्ट चिंचवड प्राधिकरण चे अध्यक्ष सुभाष बंसल,बीजेपी व्यापारी आघाडीचे शहर उपाध्यक्ष सुधीर आगरवाल,रामअवतार अगरवाल, पन्नालाल गुप्ता, वेदप्रकाश गुप्ता, राजेश आगरवाल, महाराजा अग्रसेन किचन ट्रस्टचे अध्यक्ष सीए कृष्णलाल बंसल आदी उपस्थित होते. यावेळी उद्योजक अगरवाल, विनोद गोयल, विजय गोयल, जगदीश गोयल, रामशरण गुप्ता, भगवानदास आगरवाल, कमलनाथ बंसल, प्रेमप्रकाश गोयल, विजय सिंघल, रोहित गुप्ता, सामाजिक कार्यकर्ते एम ए हुसैन यांच्यासह अनेक  दानशूर व्यक्तींना सन्मानित केले.

नामदार बापट पुढे म्हणाले कि,दुष्काळग्रस्त भागातील पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्यासाठी अगरवाल समाजाने पुढाकार घ्यावा असे आवाहन करीत पुढे म्हणाले कि, व्यवहार कसा करावा हे आगरवाल समाजाकडून शिकावे. अगरवाल समाज सत्कारणी लागेल अशा उपक्रमावरच खर्च करतात.

अगरवाल समाजातील काही कार्यकर्ते एकत्र येवून (10 ऑक्टोबर 18 )  महाराजा अग्रसेन जयंतीच्या दिवसापासून वायसीएम रुग्णालयात हा उपक्रम सुरू केला आहे. रुग्णाना मोफत भोजन पुरवठा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते एम ए हुसैन यासाठी यांचे मोठे सहकार्य मिळत आहे.
आजतागायत 4 हजार रुग्णांनी लाभ घेतला. भविष्यात पुणे व पिंपरी-  चिंचवड शहरातील अनेक रुग्णालयात हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सीए कृष्णलाल बंसल यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे आयोजनासाठी सचिव मुकेश अगरवाल,खजिनदार संजीव आगरवाल यांनी पुढाकार घेतला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के एल बंसल तर आभार संजीव अगरवाल यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.