Pimpri : क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना अभिवादन

एमपीसी न्यूज -पिंपरी येथील महात्मा फुले समता परिषदेतर्फे ११ मे रोजी महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाला महापौर राहुल जाधव यांच्यासह इतर संघटनांचे प्रतिनिधी म्हणून आनंदा कुदळे, प्रताप गुरव, सुरेश गायकवाड, चंद्रकांत डोके, संतोष जोगदंड, राजू करपे, गुलाब पानपाटील, सविता खराडे उपस्थित होते.

  • या कार्यक्रमाचे आयोजन महात्मा फुले समता परिषदेचे शहराध्यक्ष अॅड. चंद्रशेखर भुजबळ यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.