Pimpri : पिंपळे गुरव येथील उद्यानात राजमाता जिजाऊंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी

एमपीसी न्यूज -पिंपळे गुरव येथे राजमाता जिजाऊ उद्यानात गेल्या दोन वर्षापासून कोटयावधी रूपये खर्च करून उद्यानाचे आधुनिकीकरण आणि नुतनीकरनाचे काम चालू आहे. उद्यानाला राजमाता जिजाऊ असे नाव आहे. परंतु उद्यानाच्या नावाप्रमाणे उद्यानात राजमाता जिजाऊंचा पूर्णाकृती पुतळा नसणे योग्य वाटत नाही, या उद्यानाला नागरिक डायनोसर उद्यान म्हणून संबोधतात. उद्यानात दुबईच्या धर्तीवर मिराकल उद्यानाचे काम चालू आहे. त्यातच पालिकेने राजमाता जिजाऊंचा पुर्णाकृती पुतळा उभारावा, अशी मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे लेखी निवेदनांद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवडच्या नावलौकिकात आणखी भर पडेल. हिंदवी स्वराज्याची संकल्पना साकारणाऱ्या शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन, सर्व धर्माना समान वागणूक हे पंचतत्व गुणांचे बाळकडू देणाऱ्या जिजाऊंचा पुर्णाकृती भव्य पुतळा व्हावा, जेणेकरून उद्यानात आलेल्या नागरिकांना त्यांचा आदर्श डोळ्यासमोर राहून प्रेरणा मिळेल. त्यांच्या प्रेरणेतून स्वराज्य निर्माण झाले. स्त्रियांना प्रोत्साहित करणाऱ्या आणि बळकट बनवणाऱ्या राजमातेचा भव्य पुर्णाकृती पुतळा प्रेरणास्त्रोत ठरेल, यात शंकाच नाही.

  • पिंपरी-चिंचवड नागरिकांच्या भावनांचा विचार करून पूर्णाकृती पुतळा उभारावा, असे आवाहन मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड आणि त्यांच्या सर्व पदाधिकारी यांनी आमदार .लक्ष्मण जगताप यांना निवेदन दिले.यावेळी तुमच्या मागणीचा विचार करु, असे आश्वासन आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिले.

यावेळी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष.अण्णा जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे ,कार्याध्यक्ष, गजानन धारशिवकर,युवक शहर अध्यक्ष, अतिश गायकवाड,जिल्हा उपाध्यक्ष ,नियाज शेख, बदाम काबळे, गोरखनाथ वाघमारे, आळंदी शहराध्यक्ष रवी भेंनकी, अक्षय जगदाळे, निलेश जगदाळे, प्रकाश अत्रे,अशोक जाधव, कार्तिक जगदाळे, आशुतोष जगदाळे ,श्रीनिवास पानसरे ,वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते किसन फसके, संदीप गायकवाड, पि.पी पिल्ले, बंडेवार प्रकाश, वसंत मांढे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.