Pimpri: कोरोना सुरक्षेसबंधित वस्तूंवरील जीएसटी कर माफ करा- गजाजन बाबर

Pimpri: GST tax on Corona security items waived demand by Gajajan Babar संसर्गाबरोबर आर्थिक संकटाचा सामना देखील सामान्य नागरिक करत आहेत. कोरोना पासून बचावासाठी अत्यावश्यक असलेल्या संरक्षक वस्तूंची खरेदी आज महत्वाची झाली आहे.

एमपीसी न्यूज- कोरोना संरक्षणासाठी उपयुक्त पीपीई किट, सॅनिटायझर, मास्क यासारख्या वस्तूंवरील जीएसटी कर माफ करावा अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केलेल्या मागणीत बाबर म्हणतात की, देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

संसर्गाबरोबर आर्थिक संकटाचा सामना देखील सामान्य नागरिक करत आहेत. कोरोना पासून बचावासाठी अत्यावश्यक असलेल्या संरक्षक वस्तूंची खरेदी आज महत्वाची झाली आहे.

मात्र, पीपीई किट, सॅनिटायजर यासारख्या वस्तूंवर देखील सरकारने जीएसटी आकारला आहे. आताच्या घडीला अत्यावश्यक असणाऱ्या या गोष्टींवर सरकारने जीएसटी आकारू नये, अशी मागणी गजानन बाबर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.