BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : चिखलीत तीन फेब्रुवारीला हिंदु राष्ट्र-जागृती सभा

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेला संवैधानिक आधार मिळावा, यासाठी हिंदूंचे व्यापक संघटन आवश्यक आहे. हे संघटन साधण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भारतभर ठिकठिकाणी हिंदु राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर रविवारी दि. ३ फेब्रुवारीला सायंकाळी साडेपाच वाजता चिखली येथे हिंदु-राष्ट्र-जागृती सभा होणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे पराग गोखले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

श्री गजानन म्हेत्रे उद्यानाचे मैदान, सेक्टर 20, म्हेत्रेवाडी, चिखली येथे ही सभा होत आहे. या परिषदेला हिंदु जनजागृतीच्या स्वाती खाडये, हिंदु जनजागृतीचे पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक मनोज खाडये, हिंदु विधी समितीचे अॅड. निलेश सांगुळकर हे मार्गदर्शन करणार आहेत.

सभेच्या निमित्ताने जनमाणसात जागृती व्हावी, या उद्देशाने समितीच्यावतीने उद्या दि. ३० जानेवारीला सायंकाळी चार वाजता रॅलीचे आयोजन केले आहे. ही रॅली मरीआई मंदिर (चिखली) – साने चौक-कोयनानगर-महात्मा फुले नगर-कृष्णानगर-म्हेत्रेवाडी चौकांपर्यंत निघणार आहे.
यावेळी या परिषदेला सनातन संस्थेच्या कु. क्रांती पेटकर, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्या सुनंदा घुले हेही उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2

.