Pimpri : नाताळच्या पार्श्वभूमीवर ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज वस्त्रांनी बाजाराला बहर

एमपीसी न्यूज – जगभरात मोठ्या उत्साहात आणि (Pimpri)आनंदी वातावरणात साजरा करण्यात येणारा “नाताळ” सण अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज व अनुषंगिक वस्तूंनी बाजाराला बहर आली आहे.

पिंपरी चिंचवड शहरात दरवर्षी नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.

Pimpri : आईकडूनच शिकलो मी साहित्याचे धडे! – प्रा. तुकाराम पाटील

 

त्यानिमित्ताने पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, चिखली, हिंजवडी, (Pimpri)सांगवी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, रावेत, पुनावळे आकुर्डी येथील बाजार मोठ्या प्रमाणात नाताळ सणाच्या अनुषंगीक असणाऱ्या वस्तूंनी बहरल्याचे पाहायला मिळाले. शहरत कापड दुकाने, विविध शो रूम, मॉल च्या बाहेर देखील ख्रिसमस ट्री उभारून रोषणाई करण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.