Pune : सामान्यांना आर्थिक साक्षर बनवण्यात ‘आयसीएआय’चा पुढाकार

एमपीसी न्यूज-  “प्रगत तंत्रज्ञानामुळे आर्थिक व्यवहार ऑनलाईन झाले (Pune )आहेत. डिजिटल माध्यमातून आर्थिक व्यवहार करताना अनेकदा फसवणूक, तसेच सायबर चोरट्यांकडून लूट होते.

हे टाळण्यासाठी सामान्य नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी ‘आयसीएआय’ने पुढाकार घेतला असून, देशभरात आर्थिक साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे.

तसेच वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘इंडस्ट्री रेडी’ बनवण्यासाठी ‘प्रोजेक्ट सप्तर्षी’मधून 36 तासांचे कौशल्य प्रशिक्षण दिले जात आहे,” अशी माहिती दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे (डब्ल्यूआयआरसी) अध्यक्ष सीए अर्पित काबरा यांनी दिली.

Pimpri : आईकडूनच शिकलो मी साहित्याचे धडे! – प्रा. तुकाराम पाटील
बिबवेवाडी येथील आयसीएआय भवनमध्ये आयोजित (Pune )पत्रकार परिषदेत ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समिती सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, ‘डब्ल्यूआयआरसी’चे सचिव सौरभ अजमेरा, खजिनदार सीए केतन सैय्या, आयसीएआय पुणेचे चेअरमन सीए राजेश अग्रवाल, व्हाईस चेअरमन सीए अमृता कुलकर्णी, खजिनदार सीए ऋषिकेश बडवे, कार्यकारणी सदस्य सीए काशिनाथ पठारे, सीए मौशमी शहा, सीए प्रणव आपटे आदी उपस्थित होते. तत्पूर्वी, सीए काबरा व सहकाऱ्यांनी पुण्यातील जीएसटी आयुक्तालय, एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, गरवारे वाणिज्य महाविद्यालय, पूना मर्चंट चेंबर, कॉसमॉस बँक, श्रीमंत दगडूशेठ गणपती आदी ठिकाणी भेट दिली.

सीए अर्पित काबरा म्हणाले, “नागरिकांमधील अर्थसाक्षरतेसाठी आर्थिक साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे. लेखापालन पुरातन काळापासून अस्तित्वात असून, त्याच्या बदलत्या स्वरूपाचे दर्शन घडवणारे संग्रहालय विविध महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. विदेशात जाणाऱ्या सीएची संख्या वाढत आहे. नवतंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. या सर्व गोष्टीना जुळवून घेता यावे, यासाठी सीए सभासदांकरिता नियमित उपक्रम राबवले जात आहेत.

सीए केतन सैय्या म्हणाले, “आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये गृहिणी महिला सर्वाधिक बळी पडतात. त्यामुळे आर्थिक साक्षर होण्याची गरज आहे. सीए सभासदांसाठी आचारसंहितेचे पालन यावर मार्गदर्शन सत्रे आयोजिली जातात. देशाच्या अर्थव्यवस्थेला, उद्योग क्षेत्राला सक्षम करण्यासाठी सीए अधिक क्रियाशील व्हावेत, या दृष्टीने विविध चर्चासत्रे, परिषदा, कार्यशाळा नियमित घेण्यात येतात.

सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, बदलत्या काळानुसार सीए अभ्यासक्रमात बदल होत आहेत. विषयांची संख्या सहा, तर मे 2024 पासून सीए आर्टिकलपशीपचा कालावधी तीन वर्षांऐवजी दोन वर्षांचा करण्यात आला आहे. यामुळे कमी वयात विद्यार्थ्यांना सीए होता येईल. उद्योग क्षेत्राचा विस्तार पाहता मोठ्या प्रमाणात लेखापाल व सनदी लेखापाल लागणार आहेत.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.