Pimpri : डॉ. हेमंत देवकुळे यांना कर्करोगावरील उपचाराच्या उपकरणाचे पेटंट

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरणातील प्रा. डॉ. हेमंत देवकुळे यांनी (Pimpri)नॅनो पार्टिकल टेक्नॉलॉजी (अतिसूक्ष्म तंत्रज्ञान) चा वापर करून निर्माण केलेल्या कर्करोगावर वैद्यकीय उपचार करणाऱ्या उपकरणाला भारत सरकारच्या पेटंट (अधिहक्क) कार्यालयाने प्रमाणपत्र प्रदान करून नुकतीच मान्यता दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना प्रा. डॉ. हेमंत देवकुळे यांनी (Pimpri)सांगितले की, माझ्या सात सहकाऱ्यांच्या साहाय्याने अनेक दिवसांपासून केलेल्या अथक परिश्रम आणि चाचण्यांमधून आम्हाला हे यश प्राप्त झाले आहे.

Pimpri : महापालिकेच्या वतीने सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी विशेष स्पर्धेचे आयोजन; टॉयलेट सेवा ऍपचे अनावरण

 

या वैद्यकीय उपकरणामुळे शरीरातील कर्करोगाच्या पेशींचा अचूक वेध घेऊन औषधोपचार करणे सुलभ झाले आहे. त्यामुळे कर्करोगाने बाधित झालेल्या ठिकाणी नेमकेपणाने उपचार केला जाऊन त्याच्या आजूबाजूला असलेल्या निरोगी पेशींची हानी टाळता येते. याशिवाय आवश्यक आणि योग्य प्रमाणात औषधोपचार करता येतो.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.