Pimpri: भाजपच्या राजवटीत स्थायी समितीमध्ये मंजूर झालेल्या निविदांची चौकशी करा -दत्ता साने

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर वाढीव दराने निविदा येणाचा सिलसिला चालू झाला आहे. याबाबत विरोधीपक्ष म्हणून या प्रकारावर आम्ही वेळोवेळी आक्षेप घेतला आहे. शिवसेना, मनसे आणि इतर सामाजिक संस्थांनीही वाढीव दराच्या निविदांबाबत मोर्चे, आंदोलने, घेराव करुन प्रशासनाचे वेळोवेळी लक्ष वेधण्यात आले आहे. त्यामुळे भाजपच्या राजवटीत स्थायी समितीमध्ये मंजूर झालेल्या सर्व निविदांची चौकशी करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयुर कलाटे, सत्ताधारी भाजपचे नगरसेवक तुषार कामटे यांनी रस्त्यांच्या कामांच्या निविदांमध्ये रिंग झाल्याचे उघड केले आहे. यावरुन जेव्हापासून भाजप सत्तेवर आला आहे. तेव्हापासूनच निविदांमध्ये वाढीव दराच्या रिंग होत असल्याचे सिध्द होत आहे.

त्यामुळे तीन महिन्यात स्थायी समितीकडून मंजुरी देण्यात आलेल्या सर्व निविदांच्या पुढील प्रक्रीयेस स्थगिती देऊन सखोल चौकशी करण्यात यावी. या निविदांमध्ये तथ्य आढळल्यास त्या सर्व निविदा रद्द करुन फेरनिविदा काढण्यात याव्यात, अशी मागणी साने यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.