Pune : बारामतीत सीआरपीएफच्या जवानाला पोलिसांची मारहाण

एमपीसी न्यूज – बारामती पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप अशोक इंगवले या सीआरपीएफच्या जवानाने केला. केवळ मारहाणच नाही तर हातात बेड्या घालून लॉकअपमध्ये ठेऊन अत्यंत अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोपही इंगवले यांनी केला.

पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्या कार्यक्रमाची परवानगी मागण्यासाठी अशोक इंगवले हे बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. यावेळी ट्रिपलसीट दुचाकी चालविल्याच्या आरोपावरून मारहाण केल्याचा आरोप इंगवले यांनी केला.

दरम्यान, बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी मात्र हे आरोप फेटाळले. उलट सदर जवानाने पोलीस ठाण्यामध्ये खुर्च्यांची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.