Pimpri : गडकिल्ले सेवा समितीच्या वतीने सोमवारपासून मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग

एमपीसी न्यूज- गडकिल्ले सेवा समितीच्या वतीने सोमवार 21 जानेवारी ते गुरुवार 14 फेब्रुवारीपर्यंत मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आलं आहे.

मोडी लिपीच्या प्रचार व प्रसार व्हावा या हेतूने गडकिल्ले सेवा समितीच्या वतीने मागील महिन्यात ज्येष्ठ इतिहास संशोधक दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणवर्गाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर हा वर्ग पुन्हा आयोजित करण्यात आला आहे.

हा प्रशिक्षण वर्ग सोमवार 21 जानेवारी ते गुरुवार 14 फेब्रुवारीपर्यंत होणार असून त्यासाठी साहित्य सामग्री सहित 450 रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. दररोज संध्याकाळी 7 ते 8 दरम्यान भक्तीशक्ती हाॅल, माचुत्रे सभागृह, जुना तालेरा रोड, चिंचवड पुणे-33 या ठिकाणी हा प्रशिक्षण वर्ग होणार आहे.

इतिहास हा आपल्या सर्वांचाच जिव्हाळ्याचा विषय आहे, इतिहासातील अनेक दस्तऐवज मोडी लिपीत आहेत ते समजुन घेणे किंवा त्यावर अभ्यास करण्यासाठी मोडी लिपी शिकणे अनिवार्य असते. तरी या मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचा इतिहास प्रेमी, इतिहास अभ्यासक व महाविद्यालयीन विद्यार्थीं या सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अजय सोनवणे 9922989932, प्रा.अनिल दुधाने 7798187478 आणि निलेश गावडे 8237402714 या क्रमांकावर संपर्क साधावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.