Pimpri: महापालिकेतर्फे मे महिन्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी प्रशिक्षण शिबिर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने येत्या मे महिन्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी प्रशिक्षण शिबिर 2020 आयोजित करण्याचे नियोजन आहे. या शिबिरात जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या महापौर चषक शालेय क्रीडा स्पर्धेतील एकूण 20 खेळांचा समावेश करण्यात येणार आहे.

हे शिबिर सकाळी तीन तास व सायंकाळी तीन तास असे दोन सत्रात आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिर अनुषंगाने क्रीडा पर्यवेक्षक यांनी आराखडा तयार करून द्यावा, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी संबंधित विभागाल्या केल्या आहेत.

महापिलकेच्या नऊ इनडोअर व्यायाम शाळेत अद्ययावत व्यायाम शाळा साहित्य बसविण्यात येणार आहे. अद्ययावत साहित्य बसविण्यासाठी नऊ व्यायाम शाळेची क्रीडा पर्यवेक्षक यांनी पाहणी करून आवश्यक ती स्थापत्य व विद्युत विषयक कामे पूर्ण करून घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. या व्यायाम शाळेतील नादुरुस्त व्यायाम साहित्य भांडार विभागात जमा करणे व वापरता येण्या जोगे व्यायाम साहित्य इतर व्यायाम शाळेत स्थलांतर करणेचा आदेश लवकच काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, महापालिकेचे मोहननगर, भोसरी आणि थेरगाव येथील जलतरण तलाव देखभाल दुरूस्ती तसेच स्थापत्य आणि विद्यूत विभागाच्या काही कामांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. हे जलतरण तलाव तातडीने दुरुस्त करुन चालून करण्याच्या सूचना देखील पवार यांनी दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.