Pimpri : किरकोळ कारणावरून डोक्यात लोखंडी पाईप मारून खून, आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – दारू पिण्याच्या किरकोळ(Pimpri) कारणावरून एका पन्नास वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात लोखंडी पाईप मारून त्याचा खून करण्यात आला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना सोमवारी ( दि.9) आहेत दिवसांपूर्वी पिंपरी येथील लाल टोपी नगर येथे घडली आहे.

मुख्तार बादशाह शेख (वय 50 रा पिंपरी) असे मयत (Pimpri) व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी केशव पवार ( वय 21 रा पिंपरी) याला अटक केली आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात रफिक बशीर शेख (वय 41) यांनी आरोपी विरोधात फिर्यादी दिली आहे.

Pune : पुणे @ 34 अंश सेल्सिअस, ऑक्टोबर हिटने पुणेकर हैराण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारू पिण्याच्या (Pimpri)कारणावरून आरोपी व मयत मुख्तार यांच्यात वाद झाला होता. याच भांडणाचा राग मनात धरून आरोपीने मुख्तार हे पत्र्याच्या शेडमध्ये बसले असताना लोखंडी पाईप व दगड डोक्यात मारून त्यांचा खून केला. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांना याची खबर देण्यात आली, पोलिसांनी तातडीने आरोपीला बेड्या ठोकत आरोप विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसाचा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.