Pimpri :  सफाई कामगारांच्या हक्कासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांचे ठिय्या आंदोलन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने  2011 ते 2015 पर्यंतचा सफाई ( Pimpri) कामगारांचा पीएफ अजूनही जमा केलेला नाही. या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी सफाई कामगारांना सोबत घेऊन महापालिकेत ठिय्या आंदोलन केले.

Kalewadi : सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होताच चोरीला गेलेली सायकल मिळाली परत

सफाई कामगारांसह महापालिकेचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे यांच्या केबिनबाहेर बसले आणि जोपर्यंत चर्चा करून मागणी मान्य होत नाही तोपर्यंत इथेच बसून राहणार हा पवित्रा कामठे यांनी घेतला. शेवटी डांगे यांनी स्वतः सर्वांशी चर्चा केली आणि येत्या 15 दिवसात थकबाकी असलेला पी. एफ. जमा होईल असे आश्वासन दिले.

यावेळी असंघटित कष्टकरी कामगार महासंघाचे अध्यक्ष संदीपान झोंबाडे, फेरीवाला हॉकर्स महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद कांबळे, असंघटित कष्टकरी कामगार महासंघाचे सचिव सविता  खराडे, माजी नगरसेवक गणेश भोंडवे,राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस प्रशांत सपकाळ आणि सफाई कामगार ( Pimpri)  उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.