Kalewadi : सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होताच चोरीला गेलेली सायकल मिळाली परत

एमपीसी न्यूज – वाढदिवसाला भेट दिलेली सायकल एका मुलाने सोसायटीमधून (Kalewadi)  चोरून नेली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. ज्यांची सायकल चोरीला गेली त्यांनी दोन दिवसांनी सायकल चोरणाऱ्या मुलाच्या फोटोसह सोशल मीडियावर पोस्ट टाकली. अवघ्या दोन तासांत मुलाच्या आईने संबंधित व्यक्‍तीला फोन करून माझ्या मुलाने सायकल नेली असून सायंकाळपर्यंत आणून देते, असे सांगितले. सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होताच एकीकडे सोशल मीडियाचा गैरवापर होत असताना दुसरीकडे मात्र चांगल्या कामासाठीही वापर होतो, असे या घटनेतून दिसून आले आहे.
काळेवाडी परिसरात राहणाऱ्या एका मुलाला त्यांच्या आई-वडिलांनी एप्रिल महिन्यात वाढदिवसाला (Kalewadi)  सायकल घेऊन दिली. बुधवारी दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास ही सायकल सोसायटीच्या आवारातून चोरीस गेली. सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता एक मुलगा सायकल चोरून नेत असल्याचे दिसून आले.

गुरुवारी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्यादही दिली. शुक्रवारी सकाळी ज्यांची सायकल (Kalewadi) चोरीला गेली त्यांनी एक पोस्ट सोशल मिडियावर टाकली आणि सोबत सायकल चोरून नेणाऱ्या त्या मुलाचा फोटोही आणि स्वतःचा मोबाइल क्रमांक टाकला.
ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच सायकल नेणाऱ्या मुलांच्या आईचा फोन आला. ज्यांची सायकल चोरीला गेली त्यांची भेटही घेतली. माझ्या मुलाने सायकल नेली असून त्याने ती मित्राला दिली आहे. सायंकाळपर्यंत तुमची सायकल परत देतो, असेही सांगितले.
सायकल नेणाऱ्या मुलाची माहिती मिळाली असल्याने आम्ही सकाळी टाकलेली पोस्ट आता पुढे फॉरवर्ड करू नका, असा दुसरा संदेशही सोशल मीडियावर (Kalewadi)  टाकला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.