Pimpri News : पिंपरी भाजी मंडईत तरुणावर कोयत्याने वार, एकाला अटक

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाने तरुणावर कोयत्याने वार केले. तरुणाला गंभीर जखमी करत त्याच्यावर खुनी हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि. 18) रात्री साडे अकरा वाजता पिंपरी भाजी मंडई येथे घडली.

 

विशाल मनोज लोट (वय 26, रा. पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सलमान शेख (वय 30, रा. पिंपरी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

 

Pimpri News : 50 टक्के सवलतीचा लाभ घेत आमदार जगताप, उमा खापरे यांचा एसटी बसने प्रवास

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री जेवण झाल्यानंतर फिर्यादी घराजवळ शतपावली करीत होते. त्यावेळी तिथे आलेल्या सलमान याने फिर्यादीला धमकी दिली. त्यांच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. फिर्यादी पळून जात असताना त्यांना अडवून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.