Pimpri News : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा पोटनिवडणुकीत अपक्षाला पाठिंबा नाही – सचिन कुलकर्णी

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Pimpri News) अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा कोणत्याही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा नाही. आनंद दवे यांचा ब्राह्मण महासंघाचा व अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा काडीमात्र संबंध नाही. त्यामुळे कोणी गैरसमज करुन घेऊ नये, असे आवाहन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पिंपरी- चिंचवड शहराध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी केले आहे.

ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला आहे. त्यापार्श्वभूमीवर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने स्पष्टीकरण दिले. महासंघाचे शहराध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, समाजमाध्यमांवर ब्राह्मण महासंघाचा अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा असे संदेश प्रसारित झाले आहे.

Bhigwan : चालकाचा गाडीवरून ताबा सुटला; अपघातात तिघांचा मृत्यू

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ ही संघटना ब्राह्मण हितासाठी देशस्तरावर काम (Pimpri News) करणारी विस्तारित संघटना आहे. ब्राह्मण नावाच्या साधर्म्यमुळे कोणीही गैरसमज करुन घेऊ नये. कोठे ही कोणत्याही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला नाही. आनंद दवे हे त्यांच्या ब्राह्मण महासंघाच्या वतीने कसबा विधानसभा मतदारासंघात अपक्ष निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या ब्राह्मण महासंघाचा व अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा काडीमात्र संबंध नाही. त्यामुळे कोणीही गैरसमज करुन घेऊ नये, असे आवाहन कुलकर्णी यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.