Pimpri news: शहरातील खासगी रुग्णांलयाना रँपिड अँन्टीजेन टेस्ट करण्याची परवानगी द्या; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी रुग्णांलयाना रँपिड अँन्टीजेन टेस्ट करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महापालिकेकडे केली आहे.

याबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ,कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे.

त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या संख्येने खासगी रुग्णालय आहेत. यातील काही ठिकाणी कोविड सेंटर सुरु झाली आहेत. परंतु, कोरोनाची आरटीपीसीआर व रॅपिड अँन्टिजेन टेस्ट फक्त महापालिकेच्या आरोग्य केंद्रावर होते.

त्यातून संशियत व बाधित रुग्णांवर उपचार होत आहेत. त्यापैकी रँपिड अँन्टीजेन टेस्ट करणा-या नागरीकांचे प्रमाणे गेल्या एक महिन्यात हजारोंच्या संख्येने आहे. मात्र, रॅपिड अँन्टीजेन टेस्ट करण्याची परवानगी केवळ मनपा रुग्णांलयामध्येच आहे.

गेल्या काही दिवसामध्ये अनेक कंपन्यांनी कर्मचा-यांना टेस्ट रिपोर्ट अथवा आरटीसीपीआर बंधनकारक केल्याने सर्वच महापालिका आरोग्य केंद्रावर प्रचंड गर्दी होत आहे. त्यातूनच कोरोना बाधित असलेल्या व्यक्तींची सुध्दा तपासणी होत असल्याने संसर्ग पसरण्याचे ठिकाण मनपाचे आरोग्य केंद्र झाले आहे.

शहरातील सर्व खासगी रुग्णांलयांना रॅपिड अँन्टीजेन टेस्ट करण्याची परवानगी दिल्यास मनपाच्या आरोग्य केंद्रावरील ताण कमी होईल. तपासणीचे प्रमाणे वाढेल. कोरोना बांधितांची संख्या कळेल, उपचार करणेही सुलभ होईल. त्यामुळे खासगी रुग्णालयांना रॅपिड अँन्टीजेन टेस्टला परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.