Pimpri News: भाजप कामगार आघाडीच्या सरचिटणीसपदी किशोर हातागळे यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्ष कामगार आघाडी पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याची नवनिर्वाचित कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. भाजप शहराध्यक्ष तथा भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते किशोर हातागळे यांची कामगार आघाडीच्या पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

किशोर हातागळे यांनी या अगोदर बांधकाम कामगारांसाठी हजारो असंघटित कामगारांना विविध शासकीय योजनेचा लाभ देत कामगार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. याचबरोबर निगडी भाजप अध्यक्ष ही जबाबदारीही त्यांनी पार पाडली. शहरातील विविध प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला होता.

कोरोना महामारीमुळे संघटित व असंघटित कामगारांनावर बेरोजगाराची व उपासमारीची वेळ आहे. सध्या कामगार हा खूप अडचणीत असून भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या माध्यमातून कामगारांच्या न्याय व हक्कासाठी भरीव काम करणार असल्याचे मत नवनिर्वाचित सरचिटणीस किशोर हातागळे यांनी व्यक्त केले.

भाजपा कामगार आघाडी पिंपरी-चिंचवड शहर व जिल्हा, ‘चिटणीस’ (सेक्रेटरी) या पदावर सुधीर पराळे यांची नियुक्ती झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहर भाजपा शहराध्यक्ष आमदार माहेश लांडगे यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले.

यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, भाजप महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य एकनाथ पवार, नगरसेवक तथा भाजप कामगार आघाडी प्रदेश सरचिटणीस केशव घोळवे, भाजप प्रदेश सरचिटणीस प्रिती व्हिक्टर, कामगार नेते हनुमंत लांडगे तसेच भाजप कामगार आघाडीचे शहराध्यक्ष प्रकाश मुगडे हे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.