_MPC_DIR_MPU_III

Pune Crime : युवासेना पदाधिकारी खून प्रकरण : पोलिसांकडून आणखी चौघांना अटक

एमपीसी न्यूज – पुण्यातील कसबा युवा सेनेचे विभाग प्रमुख दीपक मारटकर यांची बुधवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली. ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आणखी चौघांना अटक केली आहे. फरासखाना पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे.

_MPC_DIR_MPU_IV

पोलिसांनी यापूर्वी अश्विनी सोपान कांबळे ( वय 25, बुधवार पेठ), महेंद्र मदनलाल सराफ (वय 57) आणि निरंजन सागर महंकाळे (वय 19) या तिघांना अटक केली होती. तर आता सनी कोलते, राहुल रागिर, रोहित क्षीरसागर आणि रोहित कांबळे यांना अटक केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान दीपक मारटकर यांच्यावर तब्बल 48 वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. इतक्या भीषणतेमागे नेमके कारण काय आहे याचा शोध पोलीस घेत आहे. प्रमुख आरोपी अश्विनी कांबळे आणि दीपक मारटकर यांच्यात राजकीय वैमनस्य होते. याव्यतिरिक्त या हत्या प्रकरणात आणखी कुठले कारण आहे का, याचाही पोलीस शोध घेत आहेत.

दीपक मारटकर हे शिवसेनेचे दिवंगत नगरसेवक विजय मारटकर यांचे चिरंजीव होते. बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर ते घराबाहेर आले आणि एका मित्रासोबत बसले होते. यावेळी तीन दुचाकीवरून आलेल्या सहा जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर कोयत्याने सपासप 48 वार केले. जखमी अवस्थेत दिपक यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.