Pimpri News : सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अतुल सावे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा

एमपीसी न्यूज – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त चिंचवड गावातील महात्मा जोतिबा फुले मंडळाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (3 जानेवारी)  सायंकाळी पाच वाजता चिंचवड (Pimpri News) येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह येथे सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार श्रीरंग बारणे तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महात्मा जोतिबा फुले मंडळाच्यावतीने (Pimpri News) देण्यात आली आहे.यावेळी आदर्श माता म्हणून अंजनाबाई मारुतराव जमदाडे आणि प्रमिला प्रभाकर टिळेकर यांना ,तसेच सुरय्या सिकंदर शेख फातिमा यांना सावित्री पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे .

Yoga : योग हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक – डॉ. अश्विनी तपशाळकर

श्री गुरुमां मधु गोस्वामी विष्णू लोक फाउंडेशन यांनाही राज्यस्तरीय आध्यात्म भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर सुनिता राऊत, मधुरा भेलके, मंजिरीताई धाडगे, विजयाताई गारुडकर, निशा बेलसरे, प्राजक्ता रुद्रवार, प्रमिला गोरे, सुचेता खोकले, वर्षा कांबळे, आशा कांबळे, माधुरी कोले, रोहिणी रासकर, रिद्धी गायकवाड, तृप्ती रामाने, अश्विनी दर्शले, श्रद्धा कातळे, सुनीताराजे पवार यांनाही पुरस्कार (Pimpri News) देऊन गौरविण्यात येणार आहे.या पुरस्कार सोहळ्याला अनेक मान्यवर व मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.