Pimpri News: चोर भाजप, दरोडेखोर भाजप, लूटमार नही चलेगी, महापालिका बरखास्त करा; शिवसेनेचे आंदोलन

एमपीसी न्यूज – नही चलेगी नही चलेगी लूटमार नही चलेगी, चोर भाजप, डाकू भाजप, दरोडेखोर भाजप, बरखास्त करा बरखास्त करा महापालिका बरखास्त करा, भ्रष्ट भाजपचे करायचे काय, खाली डोके वर पाय, करदात्या नागरिकांच्या पैशावर दरोडा टाकणाऱ्या भाजप नगरसेवकांचा धिक्कार असो, पैसे नागरिकांच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे” असा जोरदार घोषणा देत शिवसैनिकांनी महापालिका परिसर दणाणून सोडला.

लाच प्रकरणी एसीबीने महापालिकेतून स्थायी समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे, त्यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (मुख्य लिपिक), विजय शंभुलाल चावरिया, (पद लिपिक) , राजेंद्र जयवंतराव शिंदे (संगणक चालक), अरविंद भिमराव कांबळे, (पद शिपाई) यांना पोलिसांनी अटक केली आहे. याविरोधात शिवसेनेचे वतीने आज (शुक्रवारी) महापालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात येत आहे.

खासदार श्रीरंग बारणे, शहरप्रमुख सचिन भोसले,उपजिल्हा प्रमुख निलेश मुटके, सहसंपर्क प्रमुख योगेश बाबर, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, अनंत कोऱ्हाळे, धनंजय आल्हाट, मधुकर बाबर, सचिन सानप, सरिता साने, अनिता तुतारे आदी शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.