Pimpri News : खेळताना सातव्या मजल्यावरील गॅलरीतून पडून चिमुकला ठार

एमपीसीन्यूज : इमारतीच्या सातव्या मजल्यावरील गॅलरीत खेळात असताना अचानक खाली पडून एका १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पिंपरी येथे आज ( बुधवारी) दुपारी घडली. त्यामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.

अथर्व दीपक गावडे ( वय 11 , रा. कोहिनुर शांग्रीला, पिंपरी ), असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  अथर्व हा आपल्या भावासोबत आज दुपारी कोहिनुर शांग्रीला इमारतीच्या सातव्या मजल्यावरील गॅलरीत खेळत होता.

_MPC_DIR_MPU_II

खेळताना अचानक तो सातव्या मजल्यावरून खाली पडला. जखमी अवस्थेत त्याला तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या प्रकणी पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.