Pimpri News : महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या महाविद्यालयीन तरुणीचा कारमधील तीन जणांनी विनयभंग केला. ही घटना सोमवारी (दि. 6) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास संत तुकारामनगर पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची मैत्रीण कॉलेज सुटल्यानंतर रस्त्याने पायी चालत जात होत्या. त्यावेळी इनोव्हा कार (एम एच 12 / जे यु 6222) मधून तिघेजण आले. त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या मैत्रिणीचा कारमधून वारंवार पाठलाग केला. फिर्यादींसोबत अश्लील वर्तन करून धक्काबुक्की व शिवीगाळ करून विनयभंग केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.