HSC Result 2022 : मोठी घोषणा! उद्या लागणार बारावीचा निकाल

एमपीसी न्यूज : महाराष्ट्रातील बारावीच्या (HSC Result 2022) विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळद्वारे 2022 चा बारावीचा निकाल उदया 8 जून रोजी प्रसिद्ध केला जाणार असल्याचे महाराष्ट्र बोर्डाने जाहीर केले आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केल्याप्रमाणे उद्या दुपारी 1 वाजता mahahsscboard.in वर निकाल जाहीर होईल. त्यानंतर लवकरच महाराष्ट्र 12 वी टॉपर्स 2022 ची घोषणा केली जाईल.

पुढील साइटवर तुम्ही आपला निकाल पाहू शकता – 

mahahsscboard.in

hscresult.mkcl.org

mahresult.nic.in

Rajya sabha Elections 2022 : आघाडीचा चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल – जयंत पाटील

बारावीचा निकाल कसा तपासायचा? (HSC Result 2022)

  1. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जा – mahresult.nic.in.
  2. मुख्यपृष्ठावरील नवीनतम घोषणा विभाग तपासा.
  3. HSC निकाल 2022 (कला, विज्ञान किंवा वाणिज्य) साठी लिंक निवडा आणि त्यावर क्लिक करा.
  4. लॉगिन विंडोमध्ये परीक्षेचा रोल नंबर आणि आईचे नाव प्रविष्ट करा.
  5. तुमचा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
  6. तसेच, भविष्यातील संदर्भासाठी महाराष्ट्र 12वी परीक्षेच्या निकालाची प्रिंटआउट डाउनलोड करा आणि घ्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.