Unauthorized Constructions Wakad : महापालिकेची सकाळपासून अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Unauthorized Constructions Wakad) बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने धडक कारवाई सुरू केली आहे. वाकड-हिंजवडी रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या अनधिकृत बांधकामांवर आज (मंगळवार) सकाळपासून जोरदार कारवाई सुरु आहे.  

पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. शहरात 2012 मध्ये 66 हजार अनधिकृत बांधकामे असल्याची नोंद महापालिकेकडे होती. या नऊ वर्षांत शहरातील अनधिकृत बांधकामांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. शहरात राजरोसपणे अनधिकृत बांधकामे होत आहेत. अनधिकृत बांधकामामधील वाढ सुरुच आहे. कोरोनाच्या पावणेदोन वर्षाच्या कालावधीत अनधिकृत बांधकामावरील कारवाई थंडावली होती. पुन्हा महापालिका प्रशासनाने कारवाईची मोहिम हाती घेतली आहे.

Hinjawadi Crime News : व्यावसायिक महिलेची फसवणूक आणि बलात्कार; एकास अटक

या पथकाने मागील पंधरवाड्यात जोरदार कारवाई सुरु केली होती. दरम्यानच्या कालावधीत कारवाई थंडावली होती. आता पुन्हा धडक कारवाई (Unauthorized Constructions Wakad) सुरु केली. दोन दिवसांपासून वाकड भागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात आहे. भूमकर चौक ते ताथवडे सब-वेच्या दोन्ही बाजू, वाकड-हिंजवडी रस्याच्या दोन्ही बाजूच्या अनधिकृत बांधकामावर, पत्राशेड, टपरी यावर धडक कारवाई केली जात आहे. सकाळपासून कारवाई सुरु आहे. कारवाई पुढेही सुरु राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी साहित्य बाहेर काढून आपले नुकसान टाळावे. कारवाईला सहकार्य करावे, असे आवाहन उपअभियंता विजय भोजने यांनी केले.

अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, शहर अभियंता मकरंद निकम यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात येत आहे. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.