Pimpri News: ‘दापोडी ते निगडी रस्त्याचे अर्बन स्ट्रीटनुसार सुशोभिकरण, नागरिकांनो तुमच्या कल्पना, सूचना सांगा’महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – दापोडी ते निगडी दरम्यान अर्बन स्ट्रीट डिझाईन अंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व मोटार विरहित वाहतुकीच्या(NMT) अनुषंगाने सर्वसमावेश पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे व सुशोभिकरण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. यासाठी शहरातील नागरिकांनी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना व सूचना महापालिकेला द्याव्यात, असे आवाहन महापौर उषा ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.

बीआरटीएस विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे म्हणाले, शहरी वाहतुकीच्या दृष्टीने परिवर्तनाच्या मार्गावर आहेत. शहरीकरण व नागरिकरण यामुळे विविध सार्वजनिक वाहतूक पर्याय निवडणे आवश्यक झाले आहे. त्या दृष्टीने सकारात्मक नियोजन करुन नजीकच्या काळामध्ये सार्वजनिक वाहतूक व मोटार विरहित वाहतुक(NMT) व सर्वसमावेश पायाभूत सुविधा उभारण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार शहरातील दापोडी ते निगडी या मुख्य रस्त्याचे सलग पादचारी मार्ग व सलग सायकल मार्ग या संकल्पनेआधारे रस्त्याचे विकसन करण्याचे महानगरपालिकेचे नियोजन आहे.

दापोडी ते निगडी या मुंबई पुणे रस्त्याच्या सेवा रस्त्यांचे नुतनीकरण करण्याचे महापालिकेने नियोजन केले असून त्यामध्ये नागरिकांच्या सूचनांचा अंतर्भाव करुन सेवा रस्त्याचे डिझाईन अंतिम करावयाचा महापालिकेचा मानस आहे. त्याकरीता सद्यस्थितीतील सेवा रस्ता व त्याचे नव्याने पादचारी व सायकल चालविण्यास सुरक्षित असा नियोजित रस्ता यांचे सादरीकरण महापालिकेच्या Website व स्मार्ट सिटी Website, App येथे पाहण्यास उपलब्ध आहे. तरी, नागरिकांनी याबाबत त्यांचे अभिप्राय महापालिकेच्या संकेतस्थळ www.pcmcindia.gov.in सारथी अँप, स्मार्टसिटी संकेतस्थळ व [email protected] यावर द्यावेत, असेही सवणे म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.