Dapodi News : विक्रीसाठी आणलेचे दीड लाखांचे ब्राऊन शुगर पोलिसांनी पकडले

एमपीसी न्यूज – विक्रीसाठी आणलेले दीड लाख रुपये किमतीचे ब्राऊन शुगर पोलिसांनी पकडले. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी (दि. 25) दुपारी दापोडी येथे करण्यात आली.

आकाश बाळासाहेब फाटे (वय 22, रा. बदलापूर, जि. ठाणे), रोहन पाटील (रा. कौपरखैरणे, जि. ठाणे) आणि सौरभ पाटील (रा. खडकी, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी फाटे याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस कर्मचारी मनोज बन्सीलाल राठोड यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास आरोपी फाटे हा ब्राऊन शुगर विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार दापोडी येथील बीआरटी बस थांब्याजवळ सापळा लावून पोलिसांनी फाटे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दीड लाख रुपये किंमतीची ब्राऊन शुगर हस्तगत करण्यात आले. फाटे याने हे ब्राऊन शुगर आरोपी रोहन पाटील याच्याकडून आणून ते खडकी येथील आरोपी सौरभ पाटील याला देणार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहेत. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.