Pimpri News: संत बाळू मामांच्या दर्शनाला भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज- श्री संत बाळूमामा यांच्या मेंढी माऊली बगा नं 16 चे पिंपरी सांडस कल्लकवाडी या ठिकाणी 20 जानेवारी व 21जानेवारी रोजी मुक्काम होता. शुक्रवारी(20जानेवारी) मामांच्या रथाच्या मिरवणूकीने हिंगणगाव ते कल्लकवाडी असा प्रवास केला.यावेळी संत बाळू मामांच्या दर्शनाला(Pimpri News) भाविकांनी गर्दी केली.
कल्लकवाडी येथे संध्या.7 ते 9 विठ्ठल बिरदेव ओवीकर मंडळ कामेरी यांचा मामांच्या जीवनावर आधारित धनगरी ओव्यांचा कार्यक्रम झाला. तसेच शनिवारी (21 जानेवारी) सकाळी पहाटे श्रींचा अभिषेक करण्यात आला .सकाळी 9 वाजता मामांची आरती झाली. संध्याकाळी7 ते 9 समाजभूषण ह भ प श्री आनंद महाराज तांबे(श्रीक्षेत्र थेऊर ) यांची किर्तनरुपी सेवा सादर झाली. या कार्यक्रमासाठी 5 ते 6 हजार भाविकांची उपस्थिती होती.
यावेळी त्या बहुसंख्य भाविकांनी मामांच्या दर्शनाचा ही लाभ घेतला. रात्री 9 वाजता मामांची आरती त्यानंतर महाप्रसाद ठेवण्यात आला होता. रात्री 10 वाजता धनगरी गाणे व नृत्य वडगाव बांडे येथील तरुणांनी सादर केले.रात्री भजनी मंडळ यांनी जागर केला. या सर्व कार्यक्रमासाठी श्री संत बाळू मामा देवालय कल्लकवाडी येथील (Pimpri News)सर्व तरुण मंडळ तसेच पुजारी आनंदा ढेकळे ,सोमनाथ कुलाळ,युवराज रुपनर ,सुरेश गडदे, दिनेश आगलावे, नाना साळुंके, नितीन शितोळे ,दादा ढेकळे ,नवनाथ ढेकळे,विशाल कुलाळ, सतीश ठोंबरे, नवनाथ वाघमोडे इ. आयोजक व संयोजक कार्यकर्ते उपस्थित होते
अन्नदाना साठी निखिल ठोंबरे ,निलेश ठोंबरे मयूर बहिरट यांचे तर इतर कार्यासाठी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त यांचे सहकार्य लाभले.याबाबत माहिती ह भ प आनंद महाराज तांबे यांनी दिली.