Pimpri News : कै. पांडुरंग धोंडिबा माकर प्रतिष्ठान व शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने ‘महिला जिद्द गौरव पुरस्कार 2021’ चे वितरण

एमपीसी न्यूज – कै. पांडुरंग धोंडिबा माकर प्रतिष्ठान व शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पिंपरी चिंचवडच्या महापौर माई उर्फ उषा ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला तसेच यावेळी जयंती आणि महिला शिक्षण दिनानिमित्त ‘महिला जिद्द गौरव पुरस्कार 2021’ चे वितरण करण्यात आले.

यावेळी गटनेता नामदेव डाके, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, उपमहापौर केशव गोळवे, भारत सरकार पुणे रेल्वे बोर्डचे विशाल वाळुंजकर, अध्यक्ष दीपक माकर आदी उपस्थित होते.

तसेच यावेळी मनीषा जाधव, आशा साबळे, वैष्णवी बानुबाकोडे, शिल्पा पाटील, मनीषा पाटील, निलीमा पाटील, लीना बालीन, डॉ. उषा वसावे या महिलांना शाल श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन महिला जिद्द गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुण्यांमध्ये विकी बालीन, राजा गुंजा शारोन स्टिफन, मर्सि कदम, जयश्री नवघरे, गणेश माटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल सातपुते यांनी तर आभार प्रदर्शन रविंद्र बाईत यांनी केले व कार्यक्रमाचे आयोजक सुनील साठे, विशाल वाळुंजकर यांनी केले होते

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.