Pimpri News: वैद्यकीय विभागाच्या प्रवक्तेपदी डॉ. लक्ष्मण गोफणे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना, दैनंदिन कोरोना तपासणी, लसीकरण, औषधांची उपलब्धता, खाटांची उपलब्धता याची माहिती  देण्यासाठी सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांची वैद्यकीय विभागाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे. याबाबतचा आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी काढला आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिकास्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु, वैद्यकीय विभागाकडून त्याची माहिती पत्रकारांना, त्यांच्या माध्यमातून नागरिकांना माहिती मिळत नव्हती. याबाबत अनेकांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे तक्रार केली होती.

त्यानंतर आयुक्तांनी महापालिकेमार्फत कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना, दैनंदिन कोरोना तपासणी, लसीकरण, औषधांची, खाटांची उपलब्धता आणि इतर अनुषंगिक विषयाची माहिती रोजचे-रोज प्रसार माध्यमांद्वारे जनतेला माहिती होण्याच्या दृष्टीने वस्तुस्थितीची माहिती देण्याकरिता  सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांची अधिकृत प्रवक्तापदी नियुक्ती केली आहे.

डॉ. गोफणे यांनी महापालिका कार्यक्षेत्रातील कोरोना संबंधीचे अधिकृत वृत्त प्रसारमाध्यमांद्वारे, सोशल मीडियाद्वारे द्यावे. दरररोज सायंकाळी साडेपाच वाजता प्रसार माध्यमांना कोरोनाची माहिती द्यावी, असे आयुक्तांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.