corona vaccination News: कोरोना लसीकरणासाठी जेष्ठांचा उत्साह; पिंपरीतील 95 वर्षीय आजोबांनी घेतली लस

एमपीसी न्यूज – कोरोनाची लस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. पिंपरीगावातील 95 वर्षांचे एल.जे साठे यांनी आज (शनिवारी) मोठ्या उत्साहात कोरोनाची लस घेतली.

देशात 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांना लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्करचे लसीकरण सुरू झाले.

आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्कर्स यांचा अल्प प्रतिसाद मिळत असताना ज्येष्ठ नागरिकांचा लसीकरणाला मोठा प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.

1 मार्चपासून ज्येष्ठ नागरिक आणि 45 ते 59 वयोगटातील सहव्याधी असलेल्यांनाही यात लस देण्यात येत आहे.

पिंपरीगावात राहणारे 95 वर्षीय एल.जे. साठे यांनीही आज मोठ्या उत्साहात कोरोनाची लस घेतली. जिजामाता रुग्णालयात त्यांनी लसीचा पहिला डोस घेतला. लस घेतल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावरून आनंद ओसंडून वाहत होता.

डॉ. संजय देवधर म्हणाले, ”एल.जे. साठे माझे सासरे असून त्यांचे वय 95 वर्ष आहे. त्यांना लस घेण्याबाबत विचारले असता त्यांनी त्याला तत्काळ होकार दिला. अतिशय उत्साहात त्यांनी कोरोनाची लस टोचून घेतली. 95 वर्षांचे असले तरी ते अतिशय ठणठणीत आहेत. लस घेतल्यावर त्यांना कोणताही त्रास झालेला नाही”.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.