-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pimpri News: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश सोनवणे यांचे निधन

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश रामचंद्र सोनवणे यांचे अल्पशा आजाराने आज (सोमवारी) निधन झाले. त्यांचे वय 74 होते.

काँग्रेसच्या चिन्हावर सुरेश सोनवणे राहुलनगर भागातून महापालिकेवर निवडून आले होते. त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले होते. त्याचबरोबर 1985 ते 89 दरम्यान पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्षपद देखील त्यांनी सांभाळले होते. काँग्रेसचे फर्डे वक्ते अशी त्यांची ओळख होती.  हवेली तालुका विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवारी केली होती.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. आज दुपारी  त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. ज्येष्ठ सामजिक कार्यकर्त्या लता भिसे यांचे ते पती होते.

सुरेश सोनवणे यांच्या पार्थिवावर उद्या (मंगळवारी) सकाळी दहा वाजता वाकड गावठाणातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.