Pimpri News : जुन्या भांडणातून पती-पत्नीला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाचा राग मनात धरून पती-पत्नीला बेदम मारहाण कऱण्यात आली आहे. हा प्रकार खराळवाडी येथे 31 डिसेंबर रोजी रात्री घडला आहे. याप्रकरणी पिंपरी (Pimpri News) पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

योगेश गोडसे (वय 30) व संकेत गोडसे (वय 26) यांना अटक केली असून चेतन गोडसे (वय 32) सर्व रा. खराळवाडी (Pimpri News)  याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Pune Crime News : धक्कादायक! 100 रुपये दिले नाही म्हणून तरुणाचा मनगटापासून हातच छाटला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कामावरून घरी जाताना आरोपींनी टेरेसवरून फिर्यादीच्या डोक्यावर बाटली फेकली होती. याचा जाब फिर्यादीने विचारला होता. या जुन्या भांडणाचा राग मनात धरून तीनही आरोपींनी फिर्यादीला लोखंडी रॉडने मारहाण केली. यावेळी फिर्यादी मदतीसाठी ओरडत असताना फिर्यादीची पत्नी तेथे आली असता आरोपींनी तिलाही हाताने मारहाण केली. फिर्यादी यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने रॉड व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत गंभीर जखमी केले. यावरून पिंपरी (Pimpri News) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी दोघांना यात अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.