Pune Crime News : धक्कादायक! 100 रुपये दिले नाही म्हणून तरुणाचा मनगटापासून हातच छाटला

एमपीसी न्यूज – हल्ली कोण कोणत्या थराला (Pune Crime News) जाईल सांगता येत नाही. सध्या समाजात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. गुन्हेगारीचे महत्त्वाचे कारण पैसे आणि दारू ठरत आहे. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यातील चतुःश्रृंगी परिसरात घडली. केवळ 100 रुपये दिले नाही, म्हणून दोन तरुणांनी आणि दोन अल्पवयीन मुलांनी एका व्यक्तीचा मनगटापासून हातच छाटला.

Pune Sports News : अमनोरा-पीवायसी एचटीबीए कप बॅडमिंटन स्पर्धेत विनीत, ओजल यांना विजेतेपद

या तरुणांनी दारूच्या नशेत ‘हॅपी न्यू इयर’ म्हणण्यावरून तसेच शंभर रुपये न दिल्याच्या रागातून पंकज तांबोळी या तरुणाच्या हातावर कुर्‍हाडीने वार केला. पंकज यांचा हात मनगटापासून वेगळा झाला आहे. प्रणव काशिनाथ वाघमारे, गौरव गौतम मानवतकर या तरुणांना अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना (Pune Crime News) ताब्यात घेतले आहे.

पंकज तांबोळीचा मित्र आशुतोष माने याने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. आशुतोष, अभिजित सानमुटे, साजिद शेख, स्वप्निल पाटील, मिहीर देशपांडे हे रूममेट आहेत. 31 तारखेला मेस बंद असल्याने ते सर्वजण हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. त्यांच्यासोबत पंकज देखील गेला होता. जेवण झाल्यावर हॉटेल बाहेर आशुतोष आणि पंकज थांबले असता, दोन मुलांनी त्यांच्याकडे 100 रुपये मागितले. ते देण्यास यांनी नकार दिल्याने दोघांनी पंकजवर हल्ला केला. ही माहिती पोलीसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे पंकजचा जीव वाचला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.