Pimpri News: नेहरुनगरमधील जम्बो कोविड सेंटर तीन दिवसात कार्यान्वित होणार

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पीएमआरडीच्या वतीने नेहरुनगर येथे उभारण्यात येत असलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुढील तीन दिवसात जम्बो कोविड सेंटर सुरु केले जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रविवारी लोकार्पण झाले. त्यावेळी नेहरुनगर येथील सेंटर पुढील तीन दिवसात सुरु केले जाईल असे पवार यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यासाठी नेहरुननगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियममध्ये जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. 800 बेड असणार आहे. त्यामध्ये ऑक्सीजनयुक्त बेडची संख्या जास्त असणार आहे. त्याचेही काम अंतिम टप्प्यात आहे. पुढील तीन दिवसात त्याचेही लोकार्पण केले जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले.

या सेंटरसाठी येणारा 50 टक्के निधी राज्य सरकार आणि 50 टक्के निधी  पुणे, पिंपरी-चिंचवड पालिका, पीएमआरडी आणि जिल्हाधिकारी कार्यालय देत आहे. दरम्यान, शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णसंख्या 41 हजार पार झाली आहे. त्यामुळे बेडची आवश्यकता भासत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.