Pimpri News : डॉ. कोकाटे यांनी घेतल्या चळवळीतील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी

एमपीसीन्यूज : पुणे पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी सोमवारी (दि. १६) पिंपरी चिंचवड शहरातील पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन प्रचार केला.

यावेळी त्यांनी श्री जगद्गुरू प्रतिष्ठाणचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे यांच्या घरी जाऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच पदवीधर युवक-युवतींनी आपल्याला सहकार्य करावे, अशी भूमिका मांडली.

त्यानंतर दुपारी चार वाजता संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांच्यासह अनेक संस्थांच्या प्रमुखांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटीगाठी घेतल्या.

पदवीधरांचे प्रश्न विधान परिषदेत मांडण्यासाठी व धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी आपली उमेदवारी असल्याचे डॉ. कोकाटे यांनी स्पष्ट केले.

मागील काही महिन्यात 10  हजार मतदारांची नोंदणी आपण पूर्ण केली असून आपण विजयी होणार असल्याचा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.