Pimpri News: सफाई महिला, फ्रंटलाईन महिला कर्मचाऱ्यांची महापौरांसमवेत मेट्रो सफर

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनानिमित्त आज (मंगळवारी) भाजपा पिंपरी-चिंचवड च्या वतीने शहरातील महिलांना संपूर्ण दिवस पिंपरी ते फुगेवाडी व परतीची मेट्रो सफर करण्याची मोफत संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती. या संधीचा सायंकाळी सहा वाजेपर्यंत 5 हजार 300 महिलांनी लाभ घेतला. शिवाय सायंकाळी 6 नंतरही मेट्रो सफर करण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. यामध्ये प्रामुख्याने फ्रंटलाईन महिला कर्मचाऱ्यांबरोबरच सफाई कर्मचारी व शहरातील इतर महिलांचाही समावेश असल्याची माहिती सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.

ढाके म्हणाले,  आज सकाळी साडेसात वाजता  शहरातील महिलांची पहिली मेट्रो सफर झाली. या महिलांसमवेत  महापौर उषा ढोरे व उपमहापौर हिराबाई  घुले, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे तसेच नगरसेवक/नगरसेविका यांनी सहभाग घेतला. त्यानंतर दिवसभरात वेळ मिळेल. त्याप्रमाणे महापालिकेतील महिला कर्मचारी, फ्रंटलाईन महिला कर्मचारी, सफाई कर्मचारी व  शहरातील विविध भागातून मेट्रो सफर करण्यासाठी महिलांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेवून या मोफत मेट्रो सफरचा आनंद घेतला.

महिलांची कोणतीही गैरसोय होवू नये यासाठी भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहरच्या वतीने महिलांसाठी मेट्रो प्रवासाचे अगोदरच नियोजन करुन ठेवले होते.  दिवसभर भाजपाचे नगरसेवक/नगरसेविका त्याचप्रमाणे कार्यकर्ते नियोजनासाठी मेट्रो स्टेशनवर जातीने उपस्थित राहुन महिलांना मार्गदर्शन करीत होते, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.