Pimpri News : स्वातंत्र्य दिनी बेघर व भिक्षेकऱ्यांना मिळाले पुरण पोळीचे जेवण

ब्र.डेव्हिड काळे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. : On Independence Day, the homeless and beggars got Puran Poli meal

एमपीसी न्यूज – भारतीय स्वातंत्र्य दिनी शहरातील बेघर व भिक्षेकऱ्यांना पुरण पोळीचे गोड जेवण मिळाले. ब्र.डेव्हिड काळे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सामान्य नागरिकांची सुद्धा दैनंदिन गरजा भागविता दमछाक होत आहे. अशात सामाजिक बांधिलकी जपत ब्र.डेव्हिड काळे व सहकाऱ्यांनी शहरातील विविध भागात जाऊन बेघर व भिक्षेकऱ्यांना पुरण पोळीचे जेवण दिले.

भारतीय स्वातंत्र्य दिनी सकाळी 11 वाजता भोसरी येथील रस्त्यातील काही भिक्षेकऱ्यांना या गोड जेवणाचा आस्वाद मनसोक्तपणे दिला.

त्यानंतर शहरातील संत तुकाराम नगर, पिंपरी, कासारवाडी, दापोडी, चिंचवड, निगडी, दिघी, आळंदी, चाकण याठिकाणी प्रवास करत रस्त्यावरील भिक्षेकरी, निराश्रित यांना पोटभर जेवणाचा आनंद दिला. अचानक मिळालेल्या गोड जेवणामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता.

या उपक्रमासाठी बन्यामिन काळे यांनी पुढाकार घेत मोलाचा वाटा उचलला. तसेच, पिंपरी चिंचवड महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदचे अध्यक्ष डेव्हिड काळे, द यूनाइटेड ख्रिश्चन युथ असोसिएशन, भोसरीचे फ्रान्सिस गजभिव, शिमोन गजभिव, मनोज पिल्ले, प्रमोद वैरागर व शलमोन काळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.