Pimpri news: अठरा वर्षावरील लसीकरण लांबणीवर, लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नका; आयुक्तांचे आवाहन

एमपीसी न्यूज – अठरा वर्षावरील सर्वांचे लसीकरण 1 मे पासून केले जाणार होते. परंतु, लशींचा साठा उपलब्ध नसल्याने पिंपरी चिंचवड शहरात अठरा वर्षावरील लसीकरण लांबणीवर गेले आहे. त्यामुळे 1 मे पासून 18 वर्षावरील लसीकरणासाठी केंद्रांवर गर्दी करु नये, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.

1 मे पासून 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार होती. तथापि, सध्यस्थितीत लशींच्या उलब्धतेबाबतची मर्यादा लक्षात घेता. जोपर्यंत लशींचा पुरेसा साठा उपलब्ध होत नाही. तसेच याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त होत नाहीत तोपर्यंत 18 वर्षावरील लसीकरण करता येणार नाही.

याबाबत नागरिकांना वेळोवेळी सुचित केले जाईल. त्यामुळे 1 मे पासून 18 वर्षावरील नागरिकांनी लसीकरणासाठी गर्दी करु नये, असे आवाहन आयुक्त पाटील यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.