Pimpri News: पिंपरी ते फुगेवाडी मेट्रोमार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते रविवारी होणार ऑनलाईन उद्घाटन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पिंपरी ते फुगेवाडी दरम्यान मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाले असल्याने या मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते रविवार (दि.6) सकाळी सव्वा अकरा वाजता ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होणार असल्याची माहिती महापौर उषा ढोरे यांनी दिली. यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके उपस्थित होते.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते पुणे महानगरपालिका हद्दीतील वनाज कोथरुड ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे रविवारी (6) रोजी उद्घाटन होत आहे. त्याचबरोबर पिंपरीचेही उद्घाटन होणार आहे. महापौर म्हणाल्या की, पिंपरी-चिंचवड हद्दीतील पिंपरी ते फुगेवाडी या मार्गीकेचे काम पूर्ण झाले असल्याने या मार्गाचे उद्घाटनासाठी ऑनलाईन यंत्रणेची व्यवस्था पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भवन येथील मेट्रो स्टेशनवर केली आहे. पंतप्रधानांच्या हस्ते गरवारे कॉलेज पुणे येथुन मेट्रोला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर तेथेच पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो मार्गाचे ऑनलाईन उद्घाटन करणार आहे.

त्याचवेळी महापालिकेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक व पत्रकार पिंपरी ते फुगेवाडी या दरम्यान मेट्रोतुन प्रवास करतील. मेट्रोच्या उद्घाटनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना मेट्रोतुन प्रवास करण्याची संधी लवकरच प्राप्त होवून त्याचा आनंद लुटता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.