Pimpri Vaccination News : शहरातील ‘या’ केंद्रांवर शुक्रवारी फक्त ‘कोव्हॅक्सिन’ची लस मिळणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना पहिला आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा पहिला, दुसरा डोस उद्या (शुक्रवारी) देण्यात येणार आहे.

18 ते 44 वयोगटातील नागरिकांना ‘कोव्हॅक्सिन’ चा पहिला डोस या केंद्रांवर मिळणार !

सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी , कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह, संत तुकारामनगर, अहिल्याबाई होळकर महापालिका शाळा सांगवी, खिवंसरा हॉस्पिटल थेरगाव, नवीन जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय या 8 केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना 200 च्या क्षमतेने लस मिळणार आहे.

कोविन ॲपवर नोंदणी करुन स्लॉट बुक केलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल. उद्या सकाळी 8 नंतर कोविन ॲपवर नोंदणीसाठी स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील.

तर, ज्या 45 वर्षांपुढील नागरिकांनी, एचसीडब्ल्यू आणि फ्रंट लाईन वर्कर यांनी पूर्वी ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला डोस घेतला आहे. डोस घेऊन 28 दिवस पूर्ण झालेल्याना दुसरा तर 45 वर्षांपुढील नागरिकांना पहिला डोस या केंद्रावर मिळणार आहे.

‘कोव्हॅक्सिन’ चा पहिला, दुसरा डोस ‘या’ 8 केंद्रांवर मिळणार !

प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती, इएसआयएस हॉस्पिटल मोहननगर, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, नवीन भोसरी रुग्णालय, कासारवाडी दवाखाना, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर, पिंपळेनिलख येथील महापालिकेची इंगोले शाळा आणि प्रेमलोक पार्क दवाखाना या केंद्रावर ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा पहिला व दुसरा डोस उद्या सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत दिला जाणार आहे.

ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ॲप या पद्धतीने हे लसीकरण करण्यात येणार आहे. उद्या सकाळी 8 वाजल्यानंतर टोकन वाटप करण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.