Lonavala News : नगरसेविका ब्रिंदा गणात्रा यांच्यावतीने आदिवासींना अन्नधान्याचे वाटप

एमपीसीन्यूज : लोणावळा ग्रामीण भागातील 300 ते 350 आदिवासी बांधवाना नगरसेविका बिंद्रा गणात्रा व शिवसेवा प्रतिष्ठान यांच्या वतिने अन्नधान्य किटचे वाटप करून त्यांना मदतीचा हात देण्यात आला.

यावेळी उद्योजक रमेश पाळेकर, माजी उपसरपंच तानाजी येवले, सुनिल दळवी, सदस्या सोनाली येवले, शिवसेवा प्रतिष्ठानचे राजेश येवले, अशिष मेहता, अजित घंमेडे, प्रमोद देशपांडे, महेश थत्ते, समीर हुलावळे, तानाजी येवले, संदिप येवले, सचिन निंबाळकार,अर्जून पाठारे, सुशील येवले, तुषार येवले उपस्थितीत होते.

कोरोना संकटामुळे हातावर पोट असणाऱ्या अदिवासी बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरीब बांधवांच्या एक वेळच्या जेवणाचीही सोय होत नसल्यामुळे त्यांना मदतीचा हात म्हणून बिंद्रा गणात्रा व शिवसेवा प्रतिष्ठान यांच्यावतिने त्यांना मदतीचा हात देण्यात आला.

गेल्या एक महिन्यापासून कुरवंडे,ओळकाईवाडी, डोंगरगाव, जेवरेवाडी, करंडोली कार्ला, देवले, पाटण, औंढे -औंढोली, भाजे, देवघर, वाकसई येथील वाड्या वस्त्यांवर जाऊन एक महिना पूरेल इतके अन्नधान्य किट वाटप करण्यात येत आहे.

या पुढेही अशा गरजु बांधवांसह खंडाळा, खोपोली नागनाथ परिसरातील अदिवासी पाड्यावर जाऊन तेथील गरजुंना मदत करणार असल्याचे गणात्रा यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.