Pimpri News: खासगी क्लास, कोचिंग सेंटर्स, अभ्यासिका उघडण्यास परवानगी

एमपीसी न्यूज – ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील स्पर्धा परीक्षा क्लासेस, कोचिंग सेंटर्स, अभ्यासिका 50 टक्के क्षमतेने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कोविड 19 सरासरी पॉझिटिव्हीटी दर 5 जून रोजी 5.8 टक्के आणि ऑक्सिजन बेड उपलब्धता 15.91 टक्के होता. आजरोजी महापालिका क्षेत्रात पॉझिटिव्हीटी दर 5.2 टक्के असून ऑक्सिजन बेड उपलब्धता 10.95 टक्के आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्राबाहेरून पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कंपनी, कारखाने, बांधकाम स्थळ, हॉटेल, रेस्टॉरंट इत्यादी ठिकाणी कामासाठी येणाऱ्या कामगार व इतर व्यक्तीची निर्बंध हटविल्यानंतर कामावर रुजू होताना रॅपिड अँटिजेन टेस्ट करणे बंधनकारक राहील.

स्पर्धा परीक्षा क्लासेस, कोचिंग सेंटर्स, अभ्यासिका उघडण्यास 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील, असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.