Pimpri News : कवयित्री प्रा. डॉ. भाग्यश्री कुलकर्णी यांचे निधन

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ कवयित्री प्रा. डॉ. भाग्यश्री कुलकर्णी (54) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गुरुवारी (दि.29) निधन झाले. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान केले.

त्यांच्या पश्चात पती भालचंद्र कुलकर्णी, मुलगी मधुरा कुलकर्णी आणि सासूबाई प्रभावती कुलकर्णी असा परिवार आहे.

भाग्यश्री कुलकर्णी यांना आपल्या वडिलांकडून कवितालेखनाचा वारसा मिळालेला होता. बालपणी वडील विजय कुलकर्णी यांच्यासोबत त्यांचा ‘विजयगिरी’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला होता. त्यानंतर ‘बुटक्यांचा देश’ हा बाल कवितासंग्रह तसेच अनेक दिवाळी अंक आणि नियतकालिकांमधून त्यांच्या कविता, कथा, ललितलेखन प्रसिद्ध झाले आहेत.

पिंपरी-चिंचवडमधील विविध साहित्यिक उपक्रमांमध्ये सुमारे पंचवीस-तीस वर्षांपासून त्यांचा नियमित सहभाग होता. व्यासंग, उत्तम प्रतिभा आणि हसतमुख व्यक्तिमत्त्वाच्या प्रा. डॉ. भाग्यश्री कुलकर्णी यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे पिंपरी-चिंचवड साहित्य क्षेत्रावर दु:खाची शोककळा पसरली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.