Pimpri News: प्रहारचे कार्याध्यक्ष पंकज बगाडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

एमपीसी न्यूज – प्रहार संघटनेचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पंकज बगाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या उपस्थितीत पिंपरी येथे प्रवेश केला.

यावेळी संजोग वाघेरे बोलताना म्हणाले की,बगाडे यांनी प्रवेश केल्यामुळे त्यांचं स्वागत आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेक जण पक्षात येण्यासाठी इच्छूक आहेत.तरुण पिढीने राष्ट्रवादीच्या पक्षबांधणीसाठी काम केले पाहिजे. नव्या दमाच्या तरुणांना राष्ट्रवादीत घेऊन राष्ट्रवादीची टीम सक्रिय केली आहे. येणाऱ्या काळात पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शरद पवार यांच्या विचारांचा अजेंडा घराघरात पोहचवल्यास 2022 चा पिंपरी-चिंचवड शहराचा महापौर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा असेल.

चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रवादी पक्ष सत्तेत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराचा कायापालट केला. शहरातील एमआयडीसी भागातील कारखाने, उद्योगधंदे यांना चालना मिळाली . आता ही राज्यातील सत्तेत असताना विकासाची गंगा वाहत आहे. शरद पवार यांचे विचार, अजित पवार यांनी शहरात केलेल्या कामामुळे प्रभावित होऊन राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. येणाऱ्या काळात पक्ष बांधणीसाठी काम करणार आहे असा विश्वास पंकज बगाडे यांनी व्यक्त केला.

यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे, ऋषिकेश दादा काशीद अध्यक्ष कुंभार समाजोन्नती मंडळ पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा, महेश पानस्कर कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माथाडी पिंपरी-चिंचवड, उद्योजक गौरव शेठ अग्रवाल, उद्योजक सुरज बगाडे, उद्योजक ऋषिकेश गुंजाळ, सामाजिक कार्यकर्ते अजय कंट्रोलू  आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.